नागपूर :- बेलतरोडी पोलीसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे हद्दीत मंगलमुर्ती स्कीम जवळ, परसोडी, नागपूर येथे सापळा रचुन, पंचासमक्ष संशयीत ईसमास त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपली नावे खुशाल शत्रुघ्न मेश्राम वय ३४ वर्ष रा. परसोडी, अमीक नगर झोपडपट्टी, नागपूर असे सांगीतले. आरोपीचे ताब्यातुन मोकळया मैदानामध्ये झाडाखाली झुडपामध्ये कापडी पिशवीत लपवुन ठेवलेला २ किलो ३९९ ग्रॅम गांजा, किंमती ३६,०००/-रू, या मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपी हा स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता गांजा विक्री करण्याकरीता बाळगतांना समक्ष मिळुन आला. आरोपीचे कृत्य है कलम २० एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपीविरूध्द पोलीस ठाणे बेलतरोडी येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रश्मीता राव, पोलीस उप आयुक्त (परि.क. ४), नरेन्द्र हिवरे सहा. पोलीस आयुक्त (अजनी विभाग) यांचे मार्गदर्शानाखाली, वपोनि, मुकुंद कवाडे, दुपोनि. रूपाली बावनकर, सपोनि. राम कांडूरे, पोउपनि, किशोर मालोकर, सफौ. नंदू तायडे, अनिल गडवे, पोहवा. सुहास शिंगणे, सुमेन्द्र बोपचे, रविन्द्र आकरे, पोअं. विवेक श्रीपाद, मंगेश, प्रमोद, योगेश यांनी केली.