नागपूर :- तहसिल पोलीसांचे तपास पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, एका चार चाकी टाटा एस गाडी मध्ये प्रतिबंधीत तंवाखू अवैधरित्या नंगा पूतव्य चौक कडून लाल ईमली चौक कडे घेवुन जाणार आहे अशा खात्रीशीर माहितीवरून सापळा रचुन एक चार चाकी टाटा एस गाडी के. एम.एच ४९ डी २५१३ येतांना दिसल्याने त्यास थांबवुन चालकास नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव दिपक श्रीराम सोनवाने वय ४६ वर्ष रा. इंदोरा, ता. तिरोडा, गोंदीया, ह.मु., प्लॉट नं. ४८६, खामला, सिंधी कॉलोनी, प्रतापनगर, नागपूर असे सांगीतले. गाडीची पंवासमक्ष झडती घेतली असता गाडी मध्ये वेगवेगळया प्लास्टीक चुंगडीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु रिमझीम, गोल्डन सफारी, राजश्री, पानपराग, ब्लैक लेबल, रजनीगंधा, बाबा ब्लैक ईत्यादी कंपनीचा जर्दा. तंबाखू, पान मसाला, डब्बे पाऊच असा एकुण किंमती अंदाजे १,५९,४६७/- रू. या मिळुन आला. चालकास नमुद मालाचे मालका बाबत विचारपूस केली असता त्याने नमुद मुद्देमाल आरोपी क. २) मुकेश विठामल पिंजानी वय ४५ वर्ष रा. प्लॉट नं. ४८६, खामला, सिंधी कॉलोनी, प्रतापनगर, नागपूर याचा असल्याचे सांगीतले. आरोपींचे ताब्यातुन प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू तसेच वाहन असा एकुण ८,०९,४६७/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींने विरूध्द पोलीस ठाणे तहसिल येथे फिर्यादी अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती शितल सुधाकर देशपांडे वय ४२ वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम २२३, १२३, २७४, २७५ भा.न्या.सं., सहकलम २६(१), २६(२) (iv), २७ (३)(৫), ३०(२) (अ) अन्न सुरक्षा व मानके कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, नविनचंद्र रेड्डी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, राजेन्द्र दाभाडे, अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग) नागपुर शहर, महक स्वामी, पोलीस उप आयुक्त (परि.क्र. ३), अनिता मोरे, सहा. पोलीस आयुक्त (कोतवाली विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, मवपोनि, शुभांगी देशमुख, दुपोनि, राहुल वाढवे, पोउपनि, रसुल शेख, सफौ. अनिल ठाकुर, पोहवा, चेतन माटे, पोअं. यशवंत डोंगरे, पंकज बागडे, राशीद शेख, पंकज निकम, महेन्द्र सेलूकर व संदीप शिरकुले यांनी केली.