सावनेर येथे वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू..

सावनेर –  गेल्या एक दोन दिवसांपासून मॉन्सून सक्रिया झाला असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. आज सकाळी अंदाजे ११.३० वाजता सावनेर तालुक्यातही विजांच्या कडकडाटा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सावनेर पहलेपार येथील तरुण शेतकरी वासुदेव खंगारे वय ४२ यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सावनेर येथील वासुदेव खंगारे या गरीब शेतकऱ्याच्या दुर्देवी मुत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरूण शेतकरी हेटी बायपास जवळ आपल्या शेतात कामानिमित्त शेतामध्ये असताना सकाळी अंदाजे ११.३० वाजता पावसाचे वातावरण झाले होते अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस आल्यामुळे शेतात असतानाच त्याच्या अंगावर अचानक वीज कोसळली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वासुदेव याला तातडीने सावनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सावनेर येथील पहलेपार वस्ती येथे राहणारे वासुदेव खांगरे यांच्या पश्चात आई,बाबा, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

Next Post

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Thu Sep 7 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.06) 03 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. गुड वर्क, गोकुळपेठ नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. हिमाक्ष पार्थ इंफ्रास्ट्रक्चर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com