माहीती अद्ययावत करण्यास मनपामार्फत होणार सर्वेक्षण

– नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

चंद्रपूर :- शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा या दृष्टीने नागरीकांची आवश्यक ती माहीती गोळा करण्यास चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत एक सर्वेक्षण करण्यात येणार असुन सर्वेक्षण मनपामार्फत होत असल्याने शहरातील नागरीकांनी आपल्याकडे येणाऱ्या सर्व वॉर्ड सखींना सर्वेक्षण कामात सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

सदर सर्वेक्षण हे नावीन्य शहर स्तर संस्थेने नियुक्त केलेल्या वॉर्ड सखी मार्फत होणार असुन वॉर्ड सखी या प्रत्येक घरी भेट देणार आहेत. सर्वेक्षण करण्याकरीता लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांकरीता प्रथम एक फॉर्म नागरीकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर फॉर्म वरील माहीती नागरीकांनी एकत्र करून ठेवावी त्यानंतर वॉर्ड सखी वैयक्तिक व कौटुंबिक माहीती वेगवेगळ्या स्वरूपात फॉर्म मध्ये भरून घेतील.

शासनातर्फे विविध कल्याणकारी योजनांची आखणी करण्यात येते, या योजना लाभार्थ्यांतर्फे पोहचवुन त्याचा लाभ मिळेल याची खात्री करणे ही महानगरपालिका स्तरावर मनपाची जबाबदारी असते. योजनांची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी मनपा हद्दीतील सर्व नागरिकांची आवश्यक ती माहीती मनपाकडे असणे आवश्यक आहे. सदर माहीतीद्वारे विविध योजनांचे विविध लाभार्थी शोधणे सहज शक्य होऊन योजनांचे लाभ लाभार्थ्यांना जलद गतीने देणे शक्य होणार आहे.

गतिमान पद्धतीने शासन योजनांचा लाभ नागरीकांना देण्यात यावा हाच उद्देश असल्याने या सर्वेक्षण कार्यात नागरीकांनी सहकार्य करावे व वॉर्ड सखींना आवश्यक ती माहिती देण्याच्या आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

MASK MAKING WORKSHOP AT DPS MIHAN

Fri Apr 7 , 2023
Nagpur :-To develop the creative insight in students, DPS MIHAN organized a workshop on Mask Making for the students Grades VI and VII. Making a mask invites the creator to explore various aspects of his or her own persona. The activity can be revealing because it takes the mask maker out of the realm of words and employs imagination and […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!