– आवागमन करणाऱ्या प्रवासांनी मानले -गडकरी, बावनकुळे व सावरकरांचे आभार
कोदामेंढी :- खात रेल्वे फाटकावर काल दिनांक 9 डिसेंबर सोमवारला सायंकाळी,4:,15 च्या दरम्यान नागपूर वरून येणारी मालगाडी स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच रेल्वे फाटकावर बंद पडली, त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगात रांगा लागल्या. यादरम्यान खात येथील विविध शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टी झाल्याने तेही रेल्वे फाटका जवळ आले, यातील काही विद्यार्थ्यांनी खात येथील रेल्वे फाटका समोर नागपूर वरून येणारी मालगाडी पंचर झाली हो, पंक्चर झाली, या शाळेत शिकवणाऱ्या शब्द डोंगराच्या वापर केल्याने फाटक दुतर्फा उपस्थित वाहनचालकामध्ये व वाहनांमध्ये बसलेल्यांचा एकच हास्यकल्लोळ उडाला.
याबाबत फाटकाजवळ उपस्थित असणारे रेल्वे स्पंज कर्मचारी अंकित नागदेवे यांना विचारपूस केली असता, त्यांनी मालगाडीत तांत्रिक बिघाड आल्याने मालगाडी रेल्वे स्टेशन पूर्वीच रेल्वे फाटकासमोर मधातच थांबल्याचे सांगितले व तो बिघाड दुरुस्त होण्यासाठी 15 ते 20 मिनिटांच्या कालावधी लागणार असल्याचेही सांगितले. रामटेक भंडारा महामार्गावर खात हे स्थित असल्याने आवागमन करणाऱ्या वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने, वाहनाच्या रांगा लागत असल्याचे पाहून एसटी महामंडळाच्या बसेस रिव्हर्स जाऊन उड्डाण पुलावरून वाहतूक केल्याने व अनेक दुचाकीधारक, चारचाकी धारक यांनी रेल्वे फाटकावर गर्दी न करता रेल्वे फाटकावर बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या उपयोग करून उडान पुलावरून आवागमन केल्याने फाटक दुतर्फा लागणाऱ्या वाहनाच्या रांगा अत्यंत कमी झाल्या.
त्यामुळे हे पूल व इतरही रेल्वे फाटकावरील पूल व रेल्वे फाटकाखाली अंडरग्राउंड पूल मंजूर करून पूर्णत्वास नेणारे भारताचे उड्डयन मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा नवनियुक्त कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे व तत्कालीन आमदार टेकचंद सावरकर यांचे फाटकाच्या लांबच लांब रागा पासून तास अर्धा तास वेळ वाचल्याने, सायकलधारक, बैलबंडीधारा दुचाकीधाराक चारचाकीधारक व एसटी महामंडळात च्या बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासी लाडक्या बहिणींसह विद्यार्थीवर्गांनी आभार मानले आहे.