संदीप कांबळे, कामठी
-जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी म्हणून उन्हाळी वर्गाचे आयोजन
कामठी ता प्र 6:-विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या मुख्य प्रवाहात यावे म्हणून शिक्षक समाजसेवक नेमून नियमित शिक्षक व शिक्षण समाज सेवक यांच्या मदतीने अभ्यासात थोडे मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी वर्ग वडोदा-बिडगाव सर्कल मधील पांढरकवडा, खेडी, केम, वरंभा, भुगाव, वडोदा, तरोडी,नान्हा मांगली या नऊ शाळांमध्ये उन्हाळी वर्ग हा उपक्रम सुरू करण्यासाठी प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे जि.प. सदस्य नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये या नऊही शाळेतील शिक्षकांनी व केंद्रप्रमुख यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला 7 मे 2022 पासून सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची सभा गाव पातळीवर आयोजित करून प्रत्यक्ष उपक्रमाला 10 मे 2022 पासून सुरुवात होणार आहे.
जि प सदस्य प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे यांचा अनोखा उपक्रम
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com