संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 12:- ग्रा.पं. चिखली अंतर्गत मौजा निंबा येथील विलास बोबडे यांच्या शेतपासून ते गंगाधर झाडे यांच्या शेतापर्यंतच्या पांधन रस्त्याचे भूमिपूजन सत्ता पक्ष नेता तथा सदस्य जि.प. नागपुर प्रा अवंतिका लेकुरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कामठी पंचायत समिती आशिष मल्लेवार, उपसरपंच नरेंद्र बोंबले , अंतुरकर, अमर झाडे, जागेश्वरजी कुथे, मनोहर लांजेवार, देवराम शिंदे, अमित उके, नामदेव कडू, मधुकर कडू, अनिल गजभिये, राकेश कुथे, गोपी लांजेवार, नितीन महाकाळकर, राकेश आखरे, आणि चिखली, निंबा येथील समस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.