सावनेर :- स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ” विद्या आणि वित्त ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर आयोजन ‘आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थी कल्याण योजना’ अंतर्गत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. मिलिंद बर्बटे, मुख्य उपस्थिती प्राचार्य डॉ. पराग निमिशे तसेच प्रमुख वक्ता म्हणून आर्थिक सल्लागार दीपक शर्मा होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक योजना- समन्वयक प्रा. डॉ. विलास डोईफोडे यांनी केले. या योजनेॅतर्गत महाविद्यालयात निधी गोळा करून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्याकरिता आर्थिक मदत केल्या जाते. मागील तेरा वर्षात २८६ विध्यार्थ्यांना योजनेचा लाभ झाल्याचे प्रा. डोईफोडे म्हणाले. या वर्षी २७ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
याच प्रसंगी “आधुनिक काळात नवीन पिढीकरिता बचत आणि गुंतवणूकीचे पर्याय ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. आर्थिक नियोजनात पारंपरिक पर्यायाव्यतिरिक्त बाजारात गुंतवणूकीचे नव्याने पर्याय उपलब्ध असल्याचे प्रमुख वक्ते शर्मा म्हणाले. व्याख्यानाचा दोनशे चे वर विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
डॉ. पराग निमिशे यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्व पटवून दिले. महाविद्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या निधीद्वारे गरीब विद्यार्थ्यांना मदतीसोबत आर्थिक नियोजनाचे गांभीर्य पटते असे उदगार प्रा. बर्बटे यांनी काढले.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. चंद्रशेखर पोटोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता प्रा. प्रवीण दुलारे, चंद्रशेखर कैथलं, विलास सोहगपुरे, हेमंत पोहकार, विद्यार्थी प्रतिनिधी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमासाठी प्रा. भाके, प्रा. डोंगरे, प्रा. काकडे, प्रा. आठवले, प्रा. डबरासे, प्रा. चिंचखेडे, प्रा.साळवे, प्रा. चोधरी, प्रा. बॅनर्जी, प्रा. वाटकर, प्रा. साखरकर, प्रा. जुनघरे आणि अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
भालेराव महाविद्यालयात गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com