केंद्रातील मोदी सरकार वर जोरदार चढविला हल्ला
रामटेक – तहसील कार्यालया समोरील प्रांगणात रामटेक शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नरेंद्र मोदी सरकारच्या इंधन दरवाढ धोरणाच्या विरोधात जाहीर धरणे आंदोलन व प्रतीकात्मक शव यात्रा काढण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून, मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, भारत सरकार यांना मा. उपविभागीय अधिकारी (महसूल) यांचे माध्यमातून दरवाढ कमी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.पेट्रोल, डिझेल व गैस चे दर वाढती विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलना जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे, जिल्हापरिषद सदस्य शांताताई कुंमरे, पंचायत समिती सभापती कलाताई ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास राऊत, माजी नगरसेवक तथा काँग्रेस शहर अध्यक्ष दामोधर धोपटे यांचे नेतृत्वात केंद्रातील मोदी सरकार वर जोरदार हल्ला चढविला.
सद्यस्थितीत पेट्रोल, डिझेल चे भाव दिवेसांदिवस वाढत असल्यामुळे सामान्य जनतेच्या जिवनावर याचा अतोनात प्रभाव पडत आहे व सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती खालवत आहे. वाढत्या महागाईमुळे भाजीपाल्याचे दर, सिलेंडर चे दर घरच्या मुलभुत सुविधेचे वापाराचे सामान सुध्दा या दरवाडी महागाईमुळे वाढतच आहे.या करिता रामटेक काँग्रेस कमेटी तर्फे आज तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या सर्व सममस्यां शासनाकडे पोहचण्याचे निवेदन रामटेक उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांचे मार्फत सौपवण्या आले.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने देशात प्रचंड प्रमाणात वाढविलेली महागाई व जनतेची मोठ्या प्रमाणात होत असलेली लूट याचा तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी धरणे आंदोलनात राहुल कोठेकर, बबलू दूधबर्वे, वसंता दुंडे, स्नेहदीप वाघमारे, देवा मेहरकुळे, तुळसाबाई महाजन, सौ विमलताई नागपुरे, शारदा बर्वे ,इस्रायल शेख, अस्मिताताई बिरणवार, राहुल कोठेकर, स्नेहदीप वाघमारे, ताराचंद धनरे, अभिषेक डहारे, संजय बागडे, अश्विन सहारे, वसंत दुंडे, देवा मेहरकुळे, रमेश बिरणवार, आम्रपाली भिवगडे, विमलताई नागपुरे, शारदाताई बर्वे, शिवराम महाजन, शुभांगी रामेलवार, नरेंद्र सहारे, सुशांत राले, दिवाळु नागपुरे, अनिल बंधाटे, सुरेश जैस्वाल, वसीम कुरेशी, बबलू चिंटोले, बबीता कोठेकर, हसरत सय्यद अली, अविनाश कोल्हे, किशोर दुंडे, कवडू कांबळे, उदय बर्वे, गजानन हटवार ,सागर धावडे, राजेंद्र पानतावणे ,कृष्णा देशमुख, बारसराव नागपुरे, शांतकला महाजन, आशा भिवगडे, मंदा ढोके, रत्नमाला डोंगरे, हरीश डोंगरे, नितीन बांते, प्रदीप पाठक, रितीक अल्लडवार ,मयूर मदनकर, मोहम्मद सिद्दिकी, सचिन डोले, रसिकाला खरवडे यांचे सहित अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.