आकाश राऊत
खापरखेडा प्रतिनिधी – खापरखेडा येथे शिवसेना कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीप्रमाणे) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी छत्रपति शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले तसेच शिवरूद्र ढोल ताशा पथक यांच्या तर्फे मानवंदना देण्यात आली. व भव्य रक्तदान व रोग निदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी खासदार कृपाल तुमाने, शिवसेना जिल्हा प्रमुख राजू हरणे, युवासेना विदर्भ सचिव हर्षल काकडे, पंचायत समिती सभापती अरुणाताई शिंदे, सरपंच पुरुषोत्तम चांदेकर, उपजिल्हा प्रमुख अशोक झिंगरे, अमर जैन, अशोक वंजाळ, राहुल तिवारी, रतन ठाकुर, सावनेर तालुका प्रमुख नरेंद्र मोरे, उपतालुका प्रमुख शंकरभाऊ काकडे, माजी तालुका प्रमुख सुरेश केने आदी व शिवसेना पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशवितेसाठी सचिन गजभीये, शुभम झींगरे, प्रकाश बाळापुरे, राजू बर्वे, सुनील भोतकर, विकास बारई, दिनेश सपाटे, अनिल बावनकुले, श्रीकांत खापरे, योगित भोतकर, ललित श्रीवातस्व, अरविंद लोखंडे, युवा सेना सावनेर तालुका बाळासाहेब काकडे शिवसैनिक व शिवभक्तानी सहकार्य केले.