– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 2 : कुही तालुक्यातील किन्ही येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधु आत्माराम ठवकर यांचे वडील आत्माराम मोतीराम ठवकर (८०)यांनी गॅस गोडाऊन असलेल्या शेताच्या एका बाजूला स्वतःच सरण रचून विधिवत पूजा- अर्चा करून आत्महत्या केली. ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी दि.१ मार्चला किन्ही गावाबाहेरील असलेल्या त्यांच्याच शेतात भारत गॅस गोडाऊनच्या बाजूला आज सकाळी ६ वाजता उघडकीस आली.मृतक आत्माराम हे वारकरी होते.धार्मिक वृत्तीचे होते.तसेच ते नेहमी आजारी असायचे.परंतु आता प्रकुर्ती चांगली होती.मग मरायचे काय कारण असू शकते.मरणाच्या दिवशी गावांत मंडई निमित्त सुरू असलेले झाडीपट्टीतील नाटकाचा आनंद रात्रभर घेतला.पहाटे पाच वाजता शेताकडे आले.शेतात असलेले लाकडं एकत्र करून सरण रचले.त्यावर तनस टाकली.त्याअगोदर पूजा केली असावी कारण सरणाजवळ दिवा पेटत होता.तसेच पानाचा विडा ठेवलेला होता. त्यानंतर त्यांनी सरण पेटवून त्यावर झोपले असावे.मात्र त्यांचे पार्थिव अर्धवट जळालेले होते.यातच त्यांचा मृत्यू झाला. वेलतुर पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतांचा पंचनामा केला.व पार्थिव उत्तरीय तपासणी साठी वेलतुर येथे पाठविण्यात आला.पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत ठाणेदार आनंद कविराज यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. नितेश डोर्लीकर व शिपाई सुरपाम पुढील तपास करीत आहे. दरम्यान स्वतःच सरण रचून ८० वर्षीय वृद्धाने आत्महत्या कशी काय केली असावी,असा प्रश्न अनुत्तरित राहतो.वृद्ध माणूस सर्व काही आलबेल असताना आत्महत्येचा विचार कसा काय करू शकतो.व तोही स्वतःच सरण रचून स्वतः आगीच्या स्वाधीन होऊन आत्महत्या कशी काय करू शकेल?असे नानाविध प्रश्न उपस्थित होत आहे.परंतु घरच्यांचे काही म्हणणे नसल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत गुन्हा तपासात ठेवला आहे.