यवतमाळ :- उपविभागातील काही भागामध्ये हरभरा पिकावरील मररोग व स्पेडोप्टेरा तंबाखुचे पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी कृषि विज्ञान केंद्र व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत उपाययोजनांची शिफारस केली असून त्याचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मररोग- हरभरा पिकावरील मररोगाच्या व्यवस्थापणाकरीता ट्रायकोडर्मा २ किलो प्रति ४० किलो शेणखतात मिसळुन प्रति एकरी समप्रमाणात टाकावे.
स्पोडोप्टेरा, तंबाखुचे पाने खाणारी अळी- हरभरा पिकावरील मररोग व स्पेडोप्टेरा तंबाखुचे पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापणासाठी निबोळी अर्क ५ टक्के किवां एचएनपीव्ही १ बाय १० पीओबी प्रति मिली ५०० एलई प्रति हेक्टर किंवा व्किनॉलफॉस २५ ईसी २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रनिलीप्रोल १८.५ टक्के एससी २.५ मिली किंवा फयुबेन्डामाईड ८.३३ टक्के अधीक डेल्टामेथ्रीन ५.५६ टक्के एससी ५ मिली किंवा नोवालुरोन ५.२५ टक्के अधिक इंडोक्झाकार्ब ४.५ टक्के एससी १६.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अधिक माहिती करीता कृषि विज्ञान केंद्र, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक किंवा कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे उपविभागीय कृषि अधिकारी जे. आर. राठोड यांनी कळविले आहे.