भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

मुंबई :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस (CDS) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण दिले जाते. नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतीसाठी २० जानेवारी २०२५ ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत सी.डी.एस.(CDS) प्रशिक्षणाचे क्र. ६४ आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात निशुल्क प्रशिक्षणासह, निवास व भोजन उपलब्ध असेल अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे ६ जानेवारी २०२५ रोजी मुलाखतीस सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हजर रहावे. Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवरील सी.डी.एस.-६४ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट संपूर्ण माहितीसह आणावी.

सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे.

उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी. डी. एस. (CDS) या परीक्षेकरिता ऑनलाईन द्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सअॅप क्र. 9156073306 (प्रवेश मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मधुमक्षिका पालकांना मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

Sat Dec 21 , 2024
मुंबई :- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत विकसित केलेल्या Madhukranti.In/nbb या मधुक्रांती पोर्टलला या वेबसाईटवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक किसन मुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अद्यायावत नोंदी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल विकसित करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!