– शेत घरी ४०३०० रू.ची तर गावचे घरी १३६००० रू. अशी १७६३०० रू.ची घरफोडी
कन्हान :- जवळच असलेल्या खंडाळा (घटाटे) येथे घरी कुणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत एकाच रात्री शेतात असलेल्या घरात तसेच गावातील घरी घरफोडी करून अज्ञात चोरटयानी एकुण एक लाख छ्यात्तर हजार तीनशे रूपयांची घरफोडी करून पसार झाल्या ने कन्हान पोलीसानी दोन्ही फिर्यादीच्या तक्रारी वरून अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस आरोपीचा शोध घेत पुढील तपास करित आहे.
अल्का प्रमोद गोरे वय ५० वर्ष हयाना त्यांचे वडील मारोतराव घारड रा. खंडाळा हयानी त्यांची शेत जमीन दिल्याने त्या आपले शेतात घर बांधुन एक टयाच राहतात. शुक्रवार (दि.१३) डिसेंबर ला त्यांची मुलगी श्वेता मंगेश हुड रा. वांगी ता. तुमसर जि. भंडारा येथे भेटीसाठी गेल्या. रविवार (दि.१५) ला सकाळी ७ वाजता त्यांची वहीणी सुषमा वसंता घारड रा. खंडाळा यांनी फोन केला की, तुमच्या घरी सकाळी गायीचे दुध काढण्याकरिता गेले असता तुमच्या घराचे बाहेर अंगणात गॅस शेगडीचा बर्नल पडलेला दिसला व घराचे कुलूप व कड़ी कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने दर वाज्या जवळुन घरात डोकावुन पाहीले असता घराती ल सामान हे अस्थव्यस्थ पडलेले दिसले. सांगितल्याने त्या मुलीच्या गावुन रात्री खंडाळा (घटाटे) येथे आल्या व घराची पाहणी केली असता १) कटर मशीन (गवत कापायची) कीमत १२००० रू,२) मोटार पंपचा २० फु ट लोखंडी पाईप कि. ८०० रू, ३) सबल, पावडे शेती सामान किमत ५०० रू, ४) गँस शेगडी व दोन सिलेंडर कि. ३००० रू, ५) जर्मनचे गंज व तांदळाचे डब्बे कि. ५००० रू, ६) कपडे व इतर साहित्य कि. २००० रू, ७) पितळी भांडे २००० रू. ८) नग दी १५००० रू. असा एकुण ४०३०० रू.चा मुद्देमाल अज्ञात चोरटयाने घरफोडी करून चोरून नेल्याने फिर्यादी अल्का प्रमोद जी गोरे यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसानी (दि.१५) डिसेंबर ला अज्ञात चोरटया विरूध्द भा.न्या.सं २०२३ कलम ३३१ (४), ३०५ नुसार गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.
धनराज जागो चकोले वय ४७ वर्ष राह. खंडाळा, काम शेती हे आपल्या परिवारासह शुक्रवार (दि.१३) ला सायंकाळी त्याची साळी रोशनी सुधाकर लेंडे राह. विनोबा भावे नगर नागपुर येथे तिच्या मुली च्या वाढदिवसा करिता गेले होते. शनिवारी ते तेथेच राहिले. रविवार (दि.१५) ला सायंकाळी ६.३० वाजता त्यांचे शेजारी प्रिया आशिष वानखेडे यांचा फोन आला की तुम्हच्या घराचे कुलुप तुटले असुन दरवाजा उघडा असल्याने चोरी झाल्याचे दिसते. तेव्हा धनराज चकोले हे परिवारासह रात्री ७.४५ वाजता खंडाळा येथे येऊन घरी पाहिले तर घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले असुन आलमारीचा दरवाजा तुटलेला दिसला त्यातील १) १५ ग्रँम सोन्याची पोत किमत ९००० रु. अंदाजे, २) ०५ ग्रँम सोन्याची अंगठी २ नग कि. ३००० रू, ३) ०३ ग्रँम सोन्याची नथ २ नग कि. १७०० रू, ४) ०३ जोडे कानातले ६ नग कि. १७०० रू, ५) ३ ताईत १-१ ०३ नग कि. १७०० रू, ६) दोन कॉलेज बँग ज्यामध्ये पुस्तके व एक बॅग ज्यात मुलीचे आय कार्ड, आधार कार्ड किं. ९००० रू, ७) रोख रक्कम १,१०,००० रूप ये असा एकुण १,३६,००० रूपयाचा मुद्देमाल, रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने (दि.१४) चे सायकाळी ७.३० ते (दि.१५) डिसेंबर २०२४ चे सकाळी ६ वाजे पुर्वी घरफोडी करून चोरी केल्याने फिर्यादी धनराज जागो चकोले रा. खंडाळा यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसानी (दि.१६) डिसेंबर ला अज्ञात चोरटया विरू ध्द भा.न्या.सं. २०२३ कलम ३३१ (४), ३०५ नुसार गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.
नागपुर बॉयपास चारपदरी रस्ता, गहुहिवरा रोड तसेच खंडाळा शिवारात जेव्हा पासुन अवैद्य कोळसा टाल सुरू झाल्यापासुन खंडाळा (घटाटे) शेत शिवारा तील शेतात तसेच गावात दिवसेदिवस चोरी, घरफोडी च्या घटना वाढु लागल्या आहे. याअगोदर (दि.३०) नोव्हेबर ला खंडाळा येथील दोन शेतात पाणी सिंचन करणारे दोन समरसिबल पंप चोरी गेले होते. यामुळे गावक-यात भितीचे वातावरण निर्माण होत असल्याने पेलीस प्रशानाने याकडे लक्ष देऊन या होणा-या चो-यावर आळा घालावा, अश्या चर्चेला उधाण येत आहे.