कन्हान :- जवळच असलेल्या सिहोरा येथे इंडो एशियन मेत्ता फाऊंडेशन इंडीया व अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमा ने थायलंड, श्रीलंका आणि व्हेयतनाम या बुधिस्ट देशातुन भिक्षु संघा व्दारे प्राप्त १५१ भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे भारतातील बौद्ध विहारांना दान करून २८ भव्य बुद्ध मूर्तीच्या भूमिपुजनाचा भव्य समारंभ थाटात संपन्न करण्यात आला.
इंडो एशियन मेत्ता फाऊंडेशन इंडीया व अहिल्याबाई होळकर बहु उद्देशीय शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.१५) डिसेंबर २०२४ ला सिहोरा-कन्हान ता. पारशिवनी जि. नागपुर येथे थायलंड, श्रीलंका आणि व्हेयतनाम या बुधिस्ट देशातुन भिक्षु संघा व्दारे प्राप्त १५१ भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे भारतातील बौद्ध विहारांना दान करून २८ भव्य बुद्ध मूर्तीच्या भूमिपुजनाचा भव्य समारंभ प्रमुख अतिथी पूज्य भदन्त प्रियदर्शी भदंता रेवता धम्म, भदंत बनली महाथेरो (थायलंड), भदंत खमसिंग थेरो (थायलंड), भदंत अश्वमेघ आदीच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. याप्रसंगी थायलंड आणि इतर देशातुन पूज्य भिक्षु संघाचे आगमन झाले असुन यावेळी प्रमुख आकर्षण- पूज्य भदंत विनाचार्य यांची धम्मदेशना, थायलंडच्या भिक्षुसंघा कडुन थाई सूत्त पठन आणि विशेष बुद्ध वंदना करून सुप्रसिद्ध गायक विकास राजा यांचा आंबेडकरी जलसा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा यशवितेसाठी आयोजक तथा फाउंडेशनचे सचिव नितिन गजभिये, दिनेश शेंडे, स्मिता वाकडे, सतिश गणविर, दिलीप बागडे, मनोज बैटवार, मनोज मेश्राम, शेखर दहाट, दिनेश कळमकर, प्रशांत वाघमारे, सतिश भसारकर, शैलेश माटे, सारिखा धारगावे आदीने परिश्रम घेतंले.