‘दिलखुलास’ कार्यक्रमात कुलगुरु डॉ.दिगंबर शिर्के यांची विशेष मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी’ याविषयावर कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 लागू झाल्यापासून, भारतीय शैक्षणिक परिसंस्थेत परिवर्तनात्मक बदल घडवून आणले आहेत. त्याचा दूरगामी परिणाम अनेक बदलांमधून दिसून येत आहे. याधोरणांतर्गत अभ्यासक्रम- संरेखित शिक्षणाकडे वळणे, प्रादेशिक भाषा हे शिक्षणाचे माध्यम, शिक्षणात तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन तसेच शैक्षणिक आणि व्यावहारिक ज्ञानातील अंतर कमी करणे आदी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठात या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कशाप्रकारे करण्यात येत आहे. याचबरोबर विद्यापीठात आणखी कोणकोणते नवनवीन अभ्यासक्रम व उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. याविषयी कुलगुरु डॉ. शिर्के यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि. 14, सोमवार दि. 16, मंगळवार दि. 17 डिसेंबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. कोल्हापूरच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

Sat Dec 14 , 2024
मुंबई :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतीसाठी 30 डिसेंबर 2024 ते 8 जानेवारी 2025 या कालावधीत एस.एस.बी.(SSB) कोर्स क्र. 60 आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कालावधीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!