सिहोरा, कन्हान येथे भगवन बुद्ध यांच्या १५१ मूर्ति वाटप कार्यक्रम (दि.१५) डिसेंबरला

कन्हान :- जवळच असलेल्या सिहोरा येथे इंडो एशि यन मेत्ता फाऊंडेशन इंडीया व अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था च्या संयुक्त विद्यमाने थाय लंड, श्रीलंका आणि व्हेयतनाम या बुधिस्ट देशातुन भिक्षु संघा व्दारे प्राप्त १५१ भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे भारतातील बौद्ध विहारांना दान आणि २८ भव्य बुद्ध मूर्तीच्या भूमिपुजनाचा भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

इंडो एशियन मेत्ता फाऊंडेशन इंडीया व अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था च्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.१५) डिसेंबर २०२४ ला सिहोरा (कन्हान) ता. पारशिवनी जि. नागपुर येथे थायलंड, श्रीलंका आणि व्हेयतनाम या बुधिस्ट देशातुन भिक्षु संघा व्दारे प्राप्त १५१ भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रति मांचे भारतातील बौद्ध विहारांना दान आणि २८ भव्य बुद्ध मूर्तीच्या भूमिपुजनाचा भव्य समारंभ प्रमुख अति थी – पूज्य भदन्त प्रियदर्शी भदंता रेवता धम्म, भदंत बनली महाथेरो (थायलंड), भदंत खमसिंग थेरो (थाय लंड), भदंत अश्वमेघ आदीच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे. याप्रसंगी थायलंड आणि इतर देशातुन पूज्य भिक्षु संघाचे आगमन होणार असुन राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रामटेक खासदार श्याम कुमार बर्वे, आमदार आशिष जैस्वाल, आ. नितिन राऊत, आ. बाळाभाऊ मंगुळवर, माजी खा. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, डॉ. राजेंद्र गवई, माजी आ. डॉ. मिलिंद माने, माजी आ. डी. मलिका जुर्न रेड्डी, नगराध्यक्षा करुणा आष्टणकर, स्वागता ध्यक्ष गज्जु यादव आदी प्रमुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख आकर्षण- पूज्य भदंत विनाचार्य यांची धम्मदेशना, थायलंडच्या भिक्षुसंघा कडुन थाई सूत्त पठन आणि विशेष बुद्ध वंदना सुप्रसिद्ध गायक विकास राजा यांचा आंबेडकरी जलसा आयोजित करण्यात आला आहे. करिता या कार्यक्रमास नागपुर जिल्हयातील बहुसंख्य नागरिकांनी या ऐतिहासिक उपक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक तथा फाउंडेशनचे सचिव नितिन गजभिये यांनी केले आहे. कार्यक्रमाचा यशवितेसाठी दिनेश शेंडे, स्मिता वाकडे, सतिश गणविर, दिलीप बागडे, मनोज बैटवार, मनोज मेश्राम, शेखर दहाट, दिनेश कळमकर, प्रशांत वाघमारे, सतिश भसारकर, शैलेश माटे, सारिखा धारगावे आदी परिश्रम घेतं आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Central Railway Nagpur Division Prioritizes Safety with On-Site Inspection at Junnardeo Station

Tue Dec 10 , 2024
Nagpur :- Under the leadership of Shri Manish Agarwal, Divisional Railway Manager, Nagpur Division, Central Railway continues to take proactive steps to reinforce safety and operational excellence. In line with this commitment, Shyamal Kanti Majumder, Assistant Divisional Safety Officer (ADSO), conducted a comprehensive inspection at the worksite of Junnordeo station. Accompanied by Vikash Matey, Senior Section Engineer (TRD), Majumder engaged […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com