– मोर्शी मतदारसंघांमध्ये विकास निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
मोर्शी :- मोर्शी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. यावेळी देवेंद्र भुयार यांनी महायुतीतील मैत्रीपूर्ण निवडणुकीमुळे आपला पराभव झाला असल्याचा मुद्दा अजित पवारांसमोर मांडला. पवारांनी यावेळी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसंच पराभव झाला असला तरी पक्ष तुमच्या पाठीशी पूर्ण क्षमतेनं उभा राहील, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माजी आमदार देवेंद्र भुयार यांना दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देवेंद्र भुयार यांचे विचार जाणून घेऊन पक्ष अधिक बळकट करण्यासाठी पवारांनी पावले उचलण्यास प्रारंभ केलाय. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पुढील सर्व निवडणुकीत पक्षाला यश मिळेल यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माजी आमदार देवेंद्र भुयार यांना दिल्या.
मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये आज पर्यंतच्या इतिहासात झाली नाही तेवढी 4372 कोटी रुपयांची विकासकामे आमदार देवेंद्र भुयार यांनी 5 वर्षाच्या काळामध्ये मतदार संघामध्ये करून सुद्धा महायुतीच्या मैत्रीपूर्ण निवडणुकीमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांना पराभवाला समोर जावे लागले याची खंत देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.
2024 च्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या मोर्शी विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमुळे मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांचा पराभव झाला. 4372 कोटी रुपयांची विकास कामे करून सुद्धा जनतेने आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर विश्वास दाखवला नाही त्यामुळे देवेंद्र भुयार यांचा पराभव झाला परंतु मतदारसंघाचे हित डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही परिस्थितीत विकास कामे मागे पडणार नाही याची खबरदारी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतली असून घेऊन देवेंद्र भुयार यांनी जी कामे प्रस्तावित केलेली आहे त्या सगळ्या कामांना तात्काळ मंजुरात देऊन संपूर्ण प्रस्तावित कामे मंजूर करावी जेणेकरून सर्वसामान्य माणसांना त्याचा फायदा होईल याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री यांची आमदार देवेंद्र भुयार यांनी भेट घेतली व आगामी काळामध्ये संघटन मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि मुळे घराघरात पोहचवीण्याचे काम सुद्धा भविष्यकाळामध्ये करणार असल्याचे देवेंद्र भुयार यांनी सांगितले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारसंघांमध्ये विकास निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास आमदार देवेंद्र भुयार यांना दिला. यावेळी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजितदादा पवार यांचे स्वागत करून अभिनंदन केले.