नागपूर :- फिर्यादी शुभमसिंग दौलतसिंग राजपूत, वय २३ वर्ष, रा. ओमकार नगर, शताब्दी चौक, नागपूर है पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीतील रिलायंस स्मार्ट सुपर स्टोअर्स, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर, नागपूर येथे मॅनेजरचे पदावर कार्यरत असुन त्यांचे स्टोअर्स मध्ये ग्रोसरी व नॉन ग्रोसरीचे सामान विक्री केल्या जाते. स्टोअर्स मध्ये ऑडीटींग टिमने ऑडीटींग केली असता, स्टोअर्स मध्ये ७,८१,७६६/- रू. चे ग्रोसरी व नॉन ग्रोसरीचे सामान दिसुन आले नाही ते दिनांक ०१.०९.२०२४ चे ००.०० वा. ते दि. ०६.१२.२०२४ चे ००.०० वा. चे दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलयाचे दिसुन आले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिनांक ०७.१२.२०२४ रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे बजाजनगर येथे पोउपनि, दिपक पवार यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.