नागपूर :- महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्यामुळे भाजप ने मिळविलेले यश. त्यामुळे काँग्रेस व बसपा ची झालेली पीछेहाट तसेच संविधानाच्या नावाने भाजपा व काँग्रेस करीत असलेली मागासवर्गीयांची दिशाभूल यापासून सावध करण्यासाठी, तसेच संविधानातील हक्क व अधिकाराप्रती बहुजनांना जागृत करण्यासाठी तसेच 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या प्रमाणात राज्यभर अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून बसपा च्या प्रदेश स्तरीय समीक्षा बैठकी चे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक बसपाचे केंद्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रभारी डॉ अशोक सिद्धार्थ यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत 3 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता मुंबईच्या चेंबूर येथील बसपाच्या महाराष्ट्र प्रदेश मुख्यालयात होईल. या बैठकीत बसपाची दिवसेंन दिवस होत असलेली पीछेहाट याची समीक्षा करण्यात येईल.
या बैठकीला महाराष्ट्रातील प्रदेश स्तरीय, जिल्हा स्तरीय पदाधिकारी तसेच निवडणूक लढलेले उमेदवार प्रामुख्याने उपस्थित राहतील अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली.