नवी दिल्ली :- महाराष्ट्रातील गोंदिया येथे झालेल्या भीषण बस अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’ तून मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपयांची मदत तर जखमी झालेल्या प्रवाशांसाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
या दु:खद घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यम एक्स वर लिहिले: “गोंदिया, महाराष्ट्र येथे झालेल्या बस अपघातात जीवितहानी झाल्यामुळे अत्यंत व्यथित आहे. जखमींनी लवकर बरे व्हावे, हीच प्रार्थना. स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे. मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येतील.”
गोंदिया दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, पंतप्रधानांनी या कठिण प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहत आर्थिक मदत घोषित केली आहे.