काटोल/कोंढाळी :- काटोल – नरखेड-नागपूर (ग्रामीण) तालुक्याच्या ग्रामीण भागातील विकासाच्या नियोजनाची खडा न खड़ा माहिती (ठेवनारे) असनारे काटोल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष , काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती, नागपूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, राज्य पणन महासंघाचे संचालक,तथा श्री क्षेत्र माता अनुसया माता मंदिर पारडसिंगा संस्थे चे अध्यक्षासह विविध संघटनांशी जोडले असलेले काटोल विधानसभा मतदारसंघातील नव निर्वाचित आमदार चरणसिंग ठाकूर यांची वर्णी राज्याचे मंत्रिमंडळात लागवी, या साठी या भागातील नागरिक व मतदार तसेच लाडक्या बहिणींनी मागणी केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील राजकिय गेमचेंजर मतदार संघ म्हणून काटोल विधानसभा मतदारसंघ गणल्या जातो. माजी कृषीमंत्री व राज्याचे दोनदा कांग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले रणजीत देशमुख, ज्ञानयोगी शिक्षाविद् डॉ श्रीकांत जिचकार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख सारखे ज्येष्ठ राजकिय नेत्यांचा गढ म्हणून काटोल विधानसभा गणल्या जाते.
या अति महत्वाच्या विधानसभा सभेवर शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांची जान असनारे चरणसिंग ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकारिणी तसेच विधी व राजकिय आघाडी ने सुध्दा चरणसिंग ठाकूर यांचे कडून मंत्रिपदासाठी शिफारस करावी अशी मागणी काटोल विधानसभा मतदारसंघातील कोंढाळी, मेटपांजरा, बाजारगाव जि प सर्कल सह सर्व जि प सर्कल चे महायुती चे नागरिक तसेच धोतीवाडा,मासोद , पांजरा, दुधाळा, बिहालगोंदी, येथील युवक व नागपूर जिल्हा भाजपा चे महामंत्री नीखील जयस्वाल यांनी केली आहे.