नागपूर :- शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत, दारूबंदी कायद्यान्वये ०२ केसमध्ये एकुण ०२ ईसमावर कारवाई करून २३,०४०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०१ केसमध्ये एकुण ०१ ईसमावर कारवाई करून १,४६५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ६.३५६ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३,९४,१५०/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील मोहीम एकत्रीतरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून, यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.