सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा निरोप समारंभ संपन्न

नागपूर :- दिनांक ३१.१०.२०२४ चे १५.०० वा. नागपुर पोलीस आयुक्तालयातर्फे ऑडीटोरीयम हॉल, पोलीस भवन येथे ऑक्टोंबर २०२४ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे निरोप समारंभ कार्यकम रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांचे अध्यक्षेतेखाली तसेच निसार तांबोळी, सह पोलीस आयुक्त नागपुर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपुर शहर, यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आलेला होता. सेवानिवृत्त होणारे एकुण १९ अधिकारी आणि अंमलदार यांना सपत्नीक भावपूर्ण निरोप दिला.

याप्रसंगी पोलीस आयुक्त यांनी सर्व सेवानिवृत्त होणारे अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या पुढील आयुष्याकरीता शुभेच्छा देवुन, त्यांनी शारिरीक व मानसिक दृष्ट्‌या सदृढ राहावे तसेच, सेवानिवृत्तीचा मिळणारा आर्थिक लाभांश काळजीपुर्वक गुंतवणुक करण्याचा मोलाचा सल्ला दिला. तसेच, त्यांना निवृत्ती वेतन व ईतर सेवानिवृत्तीये लाभ लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मा. पोलीस आयुक्त यांनी स्वत्तः निरोप समारंभ कार्यक्रमाकरीता उपस्थित राहुन घेतलेली दखल व त्यांच्या हस्ते मिळालेले स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र हा एक आठवणीचा क्षण त्यांच्या या निरोप समारंभात राहीला अशा प्रकारची भावना सर्व सेवानिवृत्त अधिकारी, अंमलदार यांनी व्यक्त केली. तसेच निसार तांबोळी, सह पोलीस आयुक्त नागपुर शहर यांनी सेवानिवृत्त होणारे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे सेवाकाळात केलेले कामगिरी बद्दल प्रसंशा करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमा करीता रविन्द्र कुमार सिंगल पोलीस आयुक्त नागपूर शहर,  निसार तांबोळी, सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपुर शहर,  श्वेता खेडकर, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, मा. सहा. पोलीस आयुक्त, जयेश भांडारकर सहा. पोलीस आयुक्त (मुख्यालय), विनोद तिवारी राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय तसेन सेवानिवृत्त होणारे अधिकारी व अंमलदार हे त्यांचे परिवारासह उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपोआ. जयेश भांडारकर यांनी केले व आभारप्रदर्शन मोनिका जाजू यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पोलीस निरीक्षक, मानव संसाधन नागपूर शहर व त्यांचे सहकारी यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्राणांतीक अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Fri Nov 1 , 2024
नागपूर :- फिर्यादी नामे रशीद अनवर वल्द अमीमुल्ला अंसारी, वय ३९ वर्षे, रा. जाफर नगर, गिट्टीखदान, नागपूर व त्यांचा मित्र नामे लालसिंग सलारीया वय ५४ वर्ष रा. प्रधानमंत्री आवास योजना, सक्करदरा, नागपूर हे दोघेही सुमीत शेख सिक्यूरीटी येथे मागे ०२ वर्षा पासुन काम करतात. दिनांक ३१.१०.२०२४ चे १३.४० वा. चे पुर्वी, फिर्यादी व त्यांचा मित्र हे दोघे लालसिंग यांची हिरो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!