नागपूर :- फिर्यादी नामे निर्मला दिपनारायण चतुर्वेदी, वय ५० वर्षे, रा. श्रीकृष्णधाम, सेक्टर नं. ६, वॉक्स कुलर मागे, कोराडी रोड, मानकापुर, नागपुर ह्या ऑटो क. एम. एच. ४९ ए.आर. ६३४७ ने त्यांचे परी जात असता, पोलीस ठाणे मानकापुर हद्दीत मानकापुर ओव्हर ब्रिजवर ऑटो क. एम.एच. ३१ एफ.वि. ०८७६ ये चालकाने त्याचे ताब्यातील ऑटो भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादी बसलेल्या ऑटोला मागुन धडक देवुन स गंभीर जखमी करून पळून गेला. जखमी यांना ऑटो चालकांने उपचाराकरीता रेमडीया हॉस्पीटल येथे दाखल केले आहे. फिर्यादीचा उपचार सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे मानकापुर येथे मपोउपनि, राणे यांनी ऑटो चालक आरोपीविरूध्द कलम २८१, १२५(ब) भा.न्या.सं., सहकलम १३४, १७७ मो.वा.का. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.