यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी दोनही महामानवांस पुष्पमाला अर्पण करून अभिवानद केले.
यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया तसेच विविध विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य उपस्थितांनी देखील नमन करून अभिवादन केले.