नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे “नागपूर सायक्लोथॉन” चे आयोजन

नागपूर :- नागपूर पोलीस आयुक्तालय च्या वतीने रविवार, दि.६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६.०० वा “नागपूर सायक्लोथॉन” चे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी नागपूर शहरातील नागरिकांना मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.या सायक्लोथॉनचा मुख्य उद्देश अमली पदार्थांचे सेवन टाळण्याबाबत जनजागृती करणे, वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पटवून देणे, सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यासाठी संदेश देणे आहे.

सायक्लोथॉन मार्ग:- 

सिव्हिल लाईन्स येथील पोलीस जिमखाना, वॉकर स्ट्रीट येथून सुरू होणारी ही सायक्लोथॉन पुढील मार्गाने जाणार आहे:

-पोलीस जिमखाना वॉकर स्ट्रीट – तेलंगखेडी मंदिर – वायुसेना नगर गेट, टीव्ही टॉवर, सेंटर पॉइंट स्कूल (सेमिनरी हिल) – जापनीज गार्डन चौक – सदर पोलीस स्टेशन – व्हीसीए चौक – आकाशवाणी चौक – महाराज बाग गेट – जैन मंदिर – काचीपुरा चौक – अलंकार टॉकीज चौक – भोले पेट्रोल पंप चौक – जीपीओ चौक – न्यू आरबीआय – आयकर भवन वळण – जापनीज गार्डन चौक – वॉकर स्ट्रीटमार्गे पोलीस जिमखान्याजवळ समाप्त होईल.

अनिवार्यता :- 

सायक्लोथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे. सहभागी होण्यासाठी नागरिकांनी QR कोड स्कॅन करून नोंदणी करावी. नागपूर शहरातील युवक, महिला, खेळाडू आणि नागरिकांनी या जनजागृती उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गोंडवाना विद्यापीठाने केलेला सन्मान चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी सहाय्यभूत ठरेल - ना. सुधीर मुनगंटीवार

Thu Oct 3 , 2024
– सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते डी. लिट. प्रदान – स्वैराचारी शिक्षणाचा मार्ग न अवलंबता संस्कारित शिक्षणाचा मार्ग अंगीकारा गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठातर्फे आज प्राप्त झालेली मानद डी. लिट. ही उपाधी माझ्यासाठी विशेष असून या सन्मानाने मी भारावून गेलो आहे; विधानसभेत मी केलेल्या संसदीय संघर्षातून जे विद्यापीठ साकारले, त्याच्या विस्तारात मी योगदान देऊ शकलो त्या विद्यापीठातर्फे झालेला हा सन्मान माझ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com