माझी लाडकी बहीण योजनांमुळे महिला स्वाव¹लंबी बनल्या- आमदार चंद्रशेखर बावनकुळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 22:-राज्यातील महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.या योजनेतून महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयांची भेट दिली.महायुतीचे सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहे परंतु महाविकास आघाडीची लाडक्या बहिणींचे दर महिन्याला भेट स्वरूपात मिळणारे 1500 रुपये बंद करण्यासाठी धडपड सुरू आहे. महिलांसाठीची ही क्रांतिकारी योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाल्याने विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे त्यामुळे .मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना स्वावलंबी बनविणारी आहे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना ह्या महिलांना स्वावलंबी बनविणाऱ्या आहेत तेव्हा कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता महिलांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा व पूर्ण शक्तीनिशी राज्याच्या महायुती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भाजप कामठी शहर तर्फे कामठी येथील अग्रवाल भवन येथे आयोजित लाडक्या बहिणींचा मेळावा कार्यक्रमात व्यक्त केले.

याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर,माजी जी प सदस्य अनिल निधान, भाजप नागपूर जिल्हा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल,अजय बोढारे,अनुराधाताई अमीन, माजी जी प अध्यक्ष निशा सावरकर, मनिष वाजपेयी,राजेश रंगारी आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार बावनकुळे पुढे म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या असून त्यांच्या मते राष्ट्र विकसित करायचा असेल तर महिलांचा विकास करणे गरजेचे आहे.भारतीय जनता पार्टी जातीपाती,नात्यागोत्याचा विचार करत नाही.समाजातील प्रत्येक घटकाचा विचार आम्ही करतो, त्यामुळे महायुतीचे सरकार हे सर्वसामान्याचे तुमचे आमचे सरकार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही निरंतर चालणारी आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत लाडक्या बहिणी उपस्थित होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

न्यायिक मागण्या पूर्ण न झाल्यास कांग्रेस तर्फे शासन ,प्रशासन विरोधात जनआंदोलन उभारणार-माजी नगराध्यक्ष शकुर नागानी.

Sun Sep 22 , 2024
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 22:- स्थानिक तहसील व नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या न्यायिक मागण्या पूर्ण न करता आश्वासनाची खैरात देत नागरिकांचा विश्वासघात करीत आहेत त्यामुळे न्यायिक हक्काच्या मागणीसाठी येत्या सात दिवसात प्रलंबित न्यायिक मागण्या पूर्ण न झाल्यास स्थानिक महायुती सरकार व नगर परिषद ,तहसील प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा ईशारा माजी नगराध्यक्ष शकुर नागांनी यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com