देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे मोलाचे योगदान – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

मुंबई :- जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनने आपला व्यवसाय वृद्धिंगत करतांना सामाजिक बांधिलकी जपून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. आपण केलेले कार्य हे फक्त स्वतःपुरते मर्यादित नसून देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत त्याचे मोलाचे योगदान असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी काढले.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जिटो) च्या आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन आज जिओ सेंटर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन बोलत होते. या कार्यक्रमास जिटो चे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन च्या उल्लेखनीय कामगिरीत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. संघटनेने व्यवसाय वाढीसाठी उभारलेले नेटवर्क, कोरोना महामारीच्या काळात दिलेली आरोग्यसेवा, शिक्षण क्षेत्रात केलेली मदत, युवकांना रोजगार मिळावा यासाठी उपलब्ध करून दिलेली संधी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात गरजूंना केलेली निःस्वार्थ मदत हे अमूल्य योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल म्हणाले की, जिटो ने दाखवून दिले आहे की जेव्हा व्यवसाय आणि व्यक्ती योग्य हेतूने आणि उद्देशाने एकत्र येतात, तेव्हा ते एकाच वेळी व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रगती साधून समाजाच्या भल्यासाठी योगदान देऊ शकतात. जिटो ने त्याच उत्साहाने आणि वचनबद्धतेने त्यांचे मिशन सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. संस्थेने सुरु केलेले ‘शिका, कमवा आणि परत द्या’ हे कार्य आणि समर्पण असंख्य व्यक्ती व समुदायांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाप्रसंगी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या यश आणि प्रवासाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. संघटनेत काम करून समाजाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाजाचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भीमपुत्र विनय भांगे यांना उमेदवारी

Sun Sep 22 , 2024
– विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा – तिकीट जाहीर होताच दिली पहिली प्रतिक्रिया; राजकारणातून समाजसेवा करण्याचा निर्धार नागपूर :- विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने 11 उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा केली आहे. यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी भीमपुत्र विनय भांगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विनय भांगे हे नागपूरातील एक शेतकरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com