नरखेड हद्दीमधील जुगार अड्डयावर धाड

– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई 

नागपूर :- पोस्टे नरखेड येथील स्टाफ पोस्टे हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, पोलीस स्टेशन नरखेड हद्‌दीतील हनुमान मंदिराच्या मागे मौजा सारडी शिवार येथे काही लोक ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोस्टे नरखेड येथील स्टाफ यांना प्राप्त झाले वरून सदर स्टाफ हनुमान मंदिराच्या मागे मौजा सारडी शिवार येथे सापळा रचुन छापा टाकला असता आरोपी नामे-१) इरफान इब्राहिम शहा, वय २३ वर्ष रा काटोल २) राजकुमार धनराज गजबे वय ३६ वर्ष रा. वार्ड क ११ नरखेड ३) नसिम रसिद खॉ पठान वय ४० वर्ष रा. वार्ड १५ नरखेड ४) मोहसिन नसिर खाँ पठान वय ३० वर्ष रा. वार्ड १५ नरखेड ५) विजय गणपत ढोरे वय ३२ वर्ष रा. वार्ड कं १ नरखेड ६) फरिद बब्बु शहा वय ३९ वर्ष रा. वार्ड १५ नरखेड हे जुगार खेळतांनी मिळुन आले. एकुण ०६ जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन अंगझडतीत नगदी ९००० रूपये व हातात १८ तासपत्ते, डावावर ३४ तासपत्ते किंमती ५० रू तसेच डावावर ३ तास पत्ते कॅट किंमती १५० रू. व डावावर नगदी १५०० रू. एक पांढ-या रंगाची ताडपतरी किंमती ५०० रू., एक काळया रंगाची हिरो स्पेलंडर प्लस के एम.एच. ४० सी.पी. ९६८८ किंमती ६५०००/- रूपये असा एकुण ७६२००/- रूपयाचा मुहद्येमाल जप्त करून आरोपीतांविरूध्द पोलीस ठाणे नरखेड येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे नरखेड येथील ठाणेदार सपोनि अजित कदम, पोउपनि देविदास उमके, पोहवा गजानन तितरे, पोअं जालींदर राठोड, गणेश ताजने यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गणपती विसर्जन दरम्यान फटाक्याचे आतीशबाजीमुळे ०७ महिला जखमी, इसमांविरूद्ध पोस्टे उमरेड येथे गुन्हा नोंद

Sat Sep 21 , 2024
उमरेड :- अंतर्गत शिवस्नेह गणेश उत्सव मंडळाचा उमरेडचा राजा या गणपतीची विसर्जन मिरवणुक उमरेड शहरात आयोजीत केलेली होती. शिवस्नेह गणेश उत्सव मंडळाचा उमरेडचा राजा याची मिरवणुक ही श्रीकृष्ण मंदिर इतवारीपेठ उमरेड येथे सुरु असतांना २०.३० वा. दरम्यान मिरवणुक बघण्याकरिता तसेच ढोलताशा बघण्याकरीता लोकांची गर्दी जमलेली होती. त्या दरम्यान शिवस्नेह गणेश उत्सव मंडळाचा एका कार्यकर्त्याने जवळच असलेल्या कंस्ट्रक्शन बिल्डींगवर जावुन फटाका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com