– अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष नागपूर ग्रामीणची कारवाई
रामटेक :- पोलीस स्टेशन रामटेक येथे दाखल गुन्हा क्र. ४१/२०२४ कलम ३६३, ३७० भादंवि गुन्ह्याचे तपासात ०७ महीने पुर्ण होवुनही यातील अल्पवयीन अपहृत मुलीचा आणि संशयीत आरोपीचा शोध शोध न लागल्याने पोलीस अधिक्षक, नागपुर जिल्हा नागपुर ग्रामीण यांनी अनैतीक मानवी वाहतुक प्रतीबंधक कक्ष, नागपुर ग्रामीण यांना सदर गुन्हयाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अनैतीक मानवी वाहतुक प्रतीबंधक कक्ष, नागपुर ग्रामीण येथील स्टाफ यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून अल्पवयीन अपहृत मुलीचा व आरोपीचा कसोशीने शोध घेतला असता अल्पवयीन अपहृत मुलगी व आरोपी नामे- सोनु प्रेमसिंह चित्तोडीया वय २३ वर्ष, रा. वार्ड क्र. ४, हेटीटोला मनसर ता. रामटेक जि. नागपूर हे देवलापार येथे मिळुन आले. सदर गुन्हयाचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ तसेच अनैतीक मानवी वाहतुक प्रतीबंधक कक्ष ना.ग्रा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पुजा गायकवाड यांचे मार्गदर्शनात पोनि किशोर नगराळे व त्यांचे पथक मपोहवा ज्योती वानखेडे, मपोहवा अर्चना कांबळे, पोहवा ललीत उईके, पोना सतीश राठोड, चापोहवा मनोज मेंडुले यांनी केलेली आहे.