महिला लोकशाही दिन 17 सप्टेंबर रोजी

यवतमाळ :- महिलांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो. या तिसऱ्या सोमवारी सुट्टी असल्याने या महिन्याचा महिला लोकशाही दिन मंगळवारी दि.17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.

तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. महिलांनी प्रथम या लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. सदर तक्रारीवर योग्य कारवाई झाली नसल्यास जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार सादर करावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी आणि वैयक्तिक तक्रार किंवा निवेदने स्विकारले जाणार नाहीत, याची महिलांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज आमंत्रित

Sat Sep 14 , 2024
यवतमाळ :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीच्या १८ ते ६० वयोगटातील लाभार्थ्यांकडून दि.२६ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेंतर्गत स्थायी आणि स्थलांतरीत पध्दतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोईसुविधेसह २० मेंढ्या अधिक १ मेंढा नर अशा मेंढीगटाचे 75 टक्के अनुदानावर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com