एआरटी केंद्र, गडचिरोली येथे सामाजिक संरक्षण शिबिर संपन्न

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या सुचनेनुसार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, गडचिरोली यांच्या तर्फे 10 सप्टेंबर 2024 रोजी ART केंद्र , जिल्हा सामान्य रुग्णालय , गडचिरोली या ठिकाणी HIV / AIDS सह जगणाऱ्या व्यक्तींसाठी सामाजिक संरक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नागदेवते नोडल ऑफिसर ART केंद्र , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली येथील योगेश चेके आणि दीपक उंदीरवाडे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश्य म्हणजे HIV / AIDS सह जगणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी शासकीय योजनांची माहिती ( संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना , राज्य परिवहन बसेस फ्री पास, बालसंगोपान योजना, विधवा निवृत्ती वेतन इत्यादी. यावेळी योगेश चेके आणि दीपक उंदीरवाडे यांनी एच .आय. व्ही / एड्स ( प्रतिबंध व नियंत्रण ) कायदा 2017 याच्या बद्दल माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

डॉ. नागदेवते नोडल ऑफिसर ART केंद्र यांनी एच. आय. व्ही रुग्ण यांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास महेश भांडेकर (DPO), डॉ. अभिषेक गव्हारे (CSO) जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, शेषराव खोब्रगडे (समुपेदेशक) विहान कर्मचारी, ART कर्मचारी आणि 40 लाभार्थी उपस्थित होते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कायदा व सुव्ययवस्था राखण्यासाठी कलम 36 लागू

Wed Sep 11 , 2024
गडचिरोली :- जिल्ह्यात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरु असून 16 सप्टेंबर रोजी ईद-ए- मिलाद निमित्त मुस्लिम समाजतर्फे मिरवणूक कार्यक्रम तसेच 17 ते 19 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मुर्तीचे विर्सजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात विविध धार्मिक सण /उत्सव शांततेत पार पाडावे याकरीता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी 18 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 चे पोटकलम अ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com