– लोहमार्ग पोलिसांनी घेतला शोध
– बंदोबस्त टाळण्यासाठी लढविली युक्ती
– दीशाभूल करण्यासाठी रेल्वे गाडीत सोडला मोबाईल
नागपूर :- जम्मू काश्मीरचा बंदोबस्त टाळण्यासाठी सीआरपीएफ जवानाने युक्ती नागपूरात तुकडी आल्यानंतर तो शिर्डी साईनगर एक्सप्रेसने परस्पर निघाला. लोहमार्ग पोलिसांनी तांत्रिक तपास करीत त्याचे लोकेशन मिळविले. नंतर त्याला मनमाड रेल्वे स्थानकाहून (सिकंदराबाद एक्सप्रेमधून) ताब्यात घेतले. दलीपकुमार चव्हाण (४५) रा. अलवर, राजस्थान असे त्या जवानाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्याला नागपूरातील सीआरपीएफ युनिटच्या ताब्यात दिले.
दलीपकुमार हा सीआरपीएफ भोपाळ कुक म्हणून कार्यरत आहे. त्याला पत्नी, दोन मुले आणि आई वडिल आहेत. त्याचे कुटुंब अलवर येथे राहते. त्याला निवडणूक बंदोबस्तासाठी जम्मू काश्मीरला जायचे नव्हते. त्याने युक्ती लढविली. नागपूर रेल्वे स्थानकावर जवानांची नजर चुकवित तो प्लॅटफार्म क्रमांक ८ च्या दिशेने निघाला. शिर्डी साईनगर एक्सप्रेस फलाटावर थांबलेली होती. जनरल डब्यात बसून निघून गेला. पोलिसांची दीशाभूल करण्यासाठी अकोला जवळ त्याने गाडीच्या शौचालयात स्वतचा मोबाईल ठेवला. नंतर सिकंदराबाद एक्सप्रेसने मनमाडसाठी निघाला. दरम्यान तो बेपत्ता असल्याची लोहमार्ग पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात दलीपकुमारचा शोध घेतला.
असा घेतला शोध
नागपूर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो आढळला. त्याच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी मार्गावरील सर्व रेल्वे स्थानक, जवळचे हॉटेल, राहण्याच्या ठिकाणी चौकशी केली. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. परंतू अकोला येथे त्याचा मोबाईल एका व्यक्तीजवळ मिळाला. त्याची चौकशी केली असता शिर्डी साईनगर एक्सप्रेसच्या शौचालयात मिळाल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी अकोला रेल्वे स्थानकाहून सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो सिकंदराबाद एक्सप्रेसने निघाल्याचे समजले. पोलिसांनी त्याला धावत्या रेल्वेत ताब्यात घेतले. यावेळी तो मी नव्हेच अशी त्याची भूमीका होती. लोहमार्ग पोलिस प्रवीण खवसे यांनी त्याला ताब्यात घेतले. नागपुरात आणल्यानंतर भोपाळ युनिटला माहिती दिली. नंतर त्याला स्थानिक सीआरपीएफ युनिटच्या ताब्यात देण्यात आले.
असा झाला बेपत्ता
सीआरपीएफ भोपाळ येथील ७० जवानांची एक तुकडी जम्मू काश्मीरला बंदोबस्तासाठी रेल्वेने निघाली. २२ ऑगस्ट रोजी २०.४५ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. येथून त्यांना २४ ऑगस्टला विशेष ट्रेनने सांबा येथे जायचे होते. सर्व जवान प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर उपस्थित होते. गाडी उशिरा येणार असल्याने यादीनुसार जवान उपस्थित आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी मोजणी करण्यात आली असता एक जवान आढळला. या प्रकरणी ए/४१ वाहिनी मुख्यालय भोपाळचे सहायक उपनिरीक्षक एस. वाय. सुरेश यांच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.