प्रभाग क्र 16 मध्ये पाणी पेटले… तहसील कार्यालय वर धडक मोर्चा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 16 येथील कुंभारे कॉलोनी,शिव छत्रपती नगर,लुम्बिनी नगर,आझाद नगर परिसरात मागील काही दिवसांपासून नगर परिषद तर्फे होणाऱ्या दूषित पाणी पुरवठा मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर बऱ्याच ठिकाणी मागील कित्येक दिवसापासून पाणी पुरवठा झाले नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,.परिसरात झालेल्या पाण्याच्या ठणठणाटमुळे पाणी पेटले आहे.मागील कित्येक महिन्यापासून सुरू असलेले पाण्याच्या टाकी बांधकामाचे कार्य हे कासवगतीने सुरू असून त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही .एकीकडे या परिसरात पाण्याची तीव्र समस्या आहे तर दुसरीकडे पाणी निरर्थक वाहत आहे. वास्तविकता ज्या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही त्याठिकाणी पाण्याचे टँकर द्वारे पाणी पुरवठा करणे हे नगर परिषद चे कर्तव्य आहे मात्र तसे होत नाही उलट पाणी टँकर द्वारे पाणी विक्रीचा गोरखधंदा जोमात सुरू आहे.तेव्हा कसवगतीने सुरू असलेले पाणी टंकी च्या बांधकामाला गती देत लवकरात लवकर कामे पूर्णत्वास आणावे तसेच अतिशय मूलभूत गरज असलेल्या पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागावा यासाठी पाणी पुरवठा होत नसलेल्या ठिकाणी पाणी टँकर ने पाणी पुरवठा करण्यात यावे तसेच तंत्रिकीय बिघाड परिस्थितीत सुधार करून सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावे या मागणीसाठी आज माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांच्या नेतृत्वात त्रस्त नागरिकांसह तहसील कार्यालय वर धडक मोर्चा नेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.दरम्यान तहसीलदार गणेश जगदाडे यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी कांता मेंढे,रेखा राऊत,सुरेखा राऊत, वंदना मेश्राम, रिना रामटेके,भारती सुखदेवें, सुदर्शना राऊत,यासह मोठ्या संख्येत महिला वर्ग उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय की ओर से बैंकॉक में निद्रा पक्षाघात के आध्यात्मिक कारणों पर शोध प्रस्तुत !

Wed Aug 28 , 2024
– नियमित आध्यात्मिक साधना से निद्रा पक्षाघात दूर हो सकता है ! ‘निद्रा पक्षाघात के पीछे 60 से 90 प्रतिशत कारण पूरी तरह से आध्यात्मिक या आध्यात्मिक और मानसिक दोनों हैं, इसलिए आध्यात्मिक साधना करने से आध्यात्मिक समस्या को दूर करने में मदद मिलती है’, ऐसा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय द्वारा किए गए आध्यात्मिक शोध से ज्ञात हुआ है’, ऐसा प्रतिपादन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com