वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली हटीत प्लॉट नं. ३५, विरचक ले-आउट, पाचपावली, नागपूर येथे राहणारे फिर्यादी भरोशकुमार यादव, वय ३१ वर्षे, यांनी त्यांची डिलक्स मोटरसायकल क. एम.एच. २४ जे.एन ०४७९ किंमत्ती अंदाजे ३०,०००/- रू. ची पोलीस ठाणे सदर हद्दीत डी.आर.एम ऑफीस, गुंजन भवन, येथे लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सदर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे समांतर तपासात गुन्हेशाखा वाहन चोरी विरोधी पथकचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून, सापळा रचुन आरोपी नामे अलकेश वारू उईके, वय २५ वर्षे, रा. ग्राम हिवरा, ता. आटनेर, जि. बैतुल, मध्य प्रदेश यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा त्याचा साथिदार पाहिजे आरोपी क. २) अंकुश लखेरा रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश याचे सोबत संगणमत करून केल्याची कबुली दिली. आरोपीस अधिक सखोल विचारपूस केली असता त्याने वरील गुन्हयाव्यतीरिक्त पोलीस ठाणे सदर हद्दीत वाहन चोरीचे दोन गुन्हे केल्याचे सांगीतले. आरोपीचे ताब्यातुन एकुण ०६ मोटरसायकल एकुण किंमती अंदाजे २,५०,०००/- रू चे जप्त करण्यात आलेले आहे. आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. आरोपीला जप्त मुद्देमारासह पुढील तपासकामी सदर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शखाली, पोउपनि, अनिल इंगोल, विवेक शिंगरे, पोहवा, दिपक रिठे, विलास कोकाटे, नापोअं, अजय शुक्ला, पंकज हेडाऊ, पोअं. राहुल कुसरामे, अभय ढोणे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

Sun Aug 4 , 2024
नागपूर :-फिर्यादी संकेत बाबुराव गावंडे वय ३१ वर्ष रा. शिव ईलाईट बनविण्याचे ठेकेदार असुन त्यांचे तिरूपती डेव्हलपर्स कंपनीचे पोलीस ठाणे शंकरपूर, वर्धा रोड, नागपूर हे रोड हिंगणा हद्दीत गवसी मानापूर, येथे रोड बनविण्याचे काम सुरू असुन त्या ठिकाणी रोड बांधकामा करीता लागणारे लोखंडी चैनल ठेवलेले होते. दिनांक २७. ०७.२०२४ चे १९.३० वा. ते दि. २८.०७.२०२४ ये ०७.०० वा. चे दरम्यान, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com