वरूड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर ! 

वरूड :- वरूड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळू कोहळे, आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगेस पक्षाची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी वरूड तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली.

राष्ट्रवादीत फूट पडून महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये वरूड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळू पाटील कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वानुमते वरूड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विवीध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी वरुड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरुड तालुका अध्यक्षपदी विजय वडस्कर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरुड तालुका सेवादल प्रमुख पदी रामचंद्र राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा उपाध्यक्ष पदी तारेश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरुड तालुका युवक प्रमुख निलेश गोमकाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी वरुड विधानसभा प्रमुख युवक पदी ऋषिकेश राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुसुचित जाती जमाती वरुड प्रमुखपदी सुधाकर मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरुड शहर प्रमुख देवचंद बेलसरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरुड शहर सरचिटणीस पदी भारत खासबागे यांची नियुक्ती करण्यात आली.

मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये वरूड तालुक्यातील सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांनी नवीन जबाबदारी सह नव्या आव्हानांना पेलवत, आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षाची वाटचाल अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करून त्याचबरोबर मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांच्या सामान्य गरजा ते इतर महत्त्वांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी भर देणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नव नियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या वेळी आमदार देवेंद्र भुयार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळू कोहळे पाटिल यांनी सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यावेळी वरूड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘सीखें’च्या वतीने ४२० शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण

Sun Aug 4 , 2024
– बाभुळगाव, कळंब, नेर तालुक्यातील शिक्षकांची चार दिवशीय कार्यशाळा यवतमाळ :- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आणि सेंटर फॉर इक्वीटी अँड क्वालिटी इन युनिव्हर्सल एज्यूकेशन (सीखें) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बाभुळगाव, कळंब आणि नेर तालुक्यात ‘टीचर इनोव्हेटर प्रोग्राम’ राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत तिन्ही तालुक्यातील शिक्षकांची चार दिवशीय कार्यशाळा येथील दीनदयाल प्रोबोधिनीत नुकताच पार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com