नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (ता:२५) मनपा साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातील गांधीबाग झोन कार्यालयाला भेट दिली.
महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे नूतनीकरणाचे कार्य सुरू असल्याकारणाने मनपा साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालय येथे गांधीबाग झोनचे कार्यालय हलविण्यात आले आहे.
नवीन तयार करण्यात आलेल्या गांधीबाग झोन कार्यालयाला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट दिली.
याप्रसंगी गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार, पुरुषोत्तम फाळके, प्र. झोनल अधिकारी सुरेश खरे यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.