मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सहायता केंद्रात वाढ

– मनपातर्फे ३६ केंद्रात स्वीकारले जात आहेत अर्ज

– सुटीच्या दिवशीही सुरु राहणार केंद्रे 

चंद्रपूर :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी चंद्र्पुर महानगरपालिकेतर्फे यापूर्वी ५ सहायता केंद्रांची स्थापना करण्यात आली होती मात्र,योजनेस मिळणार प्रतिसाद व होणारी गर्दी बघता आणखी ३१ केंद्रे सुरु करण्यात आली असुन आता एकुण ३६ केंद्रांवर नागरिकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

याआधी मनपा मुख्य कार्यालय,तीन झोन कार्यालये, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय ( बीपीएल ऑफीस ) अश्या ५ केंद्रांवर नागरिकांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची सुविधा मनपातर्फे देण्यात आली होती मात्र आता या केंद्रांवर टेबल वाढविण्याबरोबरच ७ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, १६ नागरी आरोग्य वर्धिनी असे एकुण ३६ सहायता केंद्रे मनपातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.ही सर्व सहायता केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत.

या केंद्रांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले असुन मनपातर्फे दोनदा त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. अर्ज प्राप्त झाल्यावर त्यांची छाननी करून तात्पुरती यादी बनविण्यात येत आहे. केंद्रात अर्ज हे दोन्ही ऑफलाईन व ऑनलाईन माध्यमातुन स्वीकारण्यात येत आहे. अर्जदार महिलांना ” नारीशक्ती अ‍ॅप ” स्वतः डाउनलोड करूनसुद्धा अर्ज भरता येतो. त्याचप्रमाणे आशावर्कर व समूह संसाधन व्यक्ती यांनाही प्रशिक्षण देण्यात आले असल्याने अर्ज भरण्यास त्यांचीही मदत अर्जदार महिलांना घेता येणार आहे.

अर्ज भरतांना काही समस्या असल्यास संपर्क क्रमांक ७७७००१५६६३ तसेच महिला हेल्प लाईन क्र. १८१ वर संपर्क करता येतो.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी या सर्व केंद्रात निशुल्क अर्ज करता येत असल्याने नागरीकांनी जवळच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा व योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर मनपातर्फे करण्यात येत आहे.

या केंद्रांवर करावा अर्ज –

१. मनपा मुख्य कार्यालय – ३ केंद्रे

२. संजय गांधी मार्केट झोन १ कार्यालय – २ केंद्रे

३. सात मजली इमारत झोन कार्यालय क्र – २ केंद्रे

४. बंगाली कॅम्प झोन कार्यालय क्र – २ केंद्रे

५. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय – ४ केंद्रे

शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे –

१. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,रामनगर

२. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,दे. गो. तुकूम

३. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,इंदिरानगर

४. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गोपालपुरी, बालाजी वार्ड

५. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, बगडखिडकी

६. शहरी प्राथ. आरोग्य केंद्र, नेताजी चौक, बाबुपेठ

७. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सुपर मार्केट, भिवापूर

आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्रे –

१. प्रज्ञा चौक, स्वावलंबी नगर, नगिनाबाग, चंद्रपूर

२. वसंत नगर, दे. गो. तुकूम, चंद्रपूर

३. विवेकानंदन नगर, वडगाव वार्ड, चंद्रपूर

४. रवींद्रनाथ टागोर प्राथ. शाळा, विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर

५. रयतवारी कॉलरी, वार्ड नं, १९, चंद्रपूर

६. रहमत नगर, के.जी.एन. मस्जिद, चंद्रपूर

७. ताडबन, अंचलेश्वर वार्ड, नं.२, रविदास चौक, चंद्रपूर

८. झाकीर हुसेन प्रायमरी शाळा, दादमहाल वार्ड, चंद्रपूर

९. आपला दवाखाना, घुटकाळा वार्ड, चंद्रपूर

१०. लालपेठ कॉलरी नं, ३, श्रीनगर चंद्रपूर

११. गौरी तलाव बाबुपेठ, चंद्रपूर

१२. हिंग्लाज भवानी वार्ड नं. १७, साईबाबा मंदिर जवळ, चंद्रपूर

१३. महाकाली कॉलरी, प्रकाश नगर, चंद्रपूर

१४. पंचशील चौक-१, कॉलरी रोड, चंद्रपूर

१५. इंदिरा नगर, पंचशील चौक, मूल रोड, चंद्रपूर

१६. शास्त्रकार ले आऊट, रयतवारी कॉलरी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोयला मंत्रालय की उप महानिदेशक संतोष रही वेकोलि के दो दिवसीय प्रवास पर

Tue Jul 16 , 2024
नागपूर :- कोयला मंत्रालय की उप महानिदेशक संतोष वेस्टर्न कोलफ़ील्ड्स लिमिटेड (वेकोलि) के दो दिवसीय प्रवास पर रही। अपने प्रवास के प्रथम दिवस, दिनांक 15.07.2024, को उन्होंने वणी क्षेत्र का दौरा किया। यहाँ उन्होंने निलजई उप क्षेत्र के बूम बैरियर्स के कार्य तथा आईटी उपक्रमों का निरीक्षण किया एवं इस दिशा में अपने महत्वपूर्ण सुझाव दिए। उनके साथ मुख्य सतर्कता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com