नागपूर :- सरपंच भवन सिविल लाईन नागपूर येथे नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे भक्त बुलंदशहा यांच्या पुतळ्यापासून 14 जुलै रोजी, हा दौरा सुरू करण्यात येत असून प्रदेश कार्यकारणी शहर जिल्हा व विधानसभा अध्यक्ष यांच्याशी येणाऱ्या विधानसभा निवडणूकी बद्दल व पार्टीचा प्रचार, प्रसार, बद्दल राष्ट्रीय कार्यकारणी यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली येथे संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करण्यात येईल. रविवारी 14 जुलै रोजी, नागपूरला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समस्त नागरीकानी आर्वाजून उपस्थित राहावे. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष तुलेश्वर मरकाम विधायक, आणि श्याम सिंह मरकाम राष्ट्रीय महासचिव बलवीर सिंह तोमर राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरीश उईके यांची कार्यकर्ता मेळाव्यात प्रामुख्याने उपस्थिती राहतील.संरपच भवन (जिल्हा) सिव्हिल लाईन नागपूर येथे कार्यकर्ता मेळावा सकाळी 12 ते 4 या वेळेत होणार आहे.15 जुलै रोजी चंद्रपूर जिल्हा आणि 16 जुलै रोजी यवतमाळ करिता प्रयाण करतील.पुढील दौरा चंद्रपूर अमरावती वर्धा होत सम्पूर्ण महाराष्ट्र दौरा करण्यात येईल तरी सर्व नागरीकांना उपस्थित राहावे. असे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष दिनेश सीडाम आणि नागपूर जिल्हाध्यक्षा गंगा टेकाम यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.