खापरखेडा :- पोलीसांनी दिनांक २१/०६/२०२४ रोजी खापरखेडा परिसरात पेट्रोलिंग करित असताना बातमीदाराकडुन माहीती मिळाली की चनकापुर कॉलनी वार्ड क. ४ येथे राहणारा उमाशंकर निशाद याचेकडे देशी कट्टा आहे. सदरची माहीती ठाणेदार धनाजी जळक पो.स्टे. खापरखेडा यांना देऊन त्यांनी उपविभागिय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांना देऊन वरिष्ठांचे आदेश घेऊन दिनांक २१/०६/२०२४ रोजी खापरखेडा पोलीस हे पेट्रोलिंग दरम्यान चनकापुर वार्ड क. ४ येथील उमाकांत उर्फ राजु भैय्यालाल निशाद यांचे घरी जाऊन त्यास ताब्यात घेऊन देशी कट्टाबाबत विचारपुस केली असता उमाशंकर निशाद याने त्याचे घराचे मागील वाडीतुन झाडीझुडपातुन एक लोखंडी देशी कट्टा (अग्नीशस्त्र) किंमती १०,०००/-रू ची काढुन दिल्याने मौक्यावर जप्त केले आरोपीविरूद्ध कलम ३/२५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागिय पोलीस अधिक्षक संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार धनाजी जळक, पो.उप.नि खोब्रागडे, डी. बी. पथक प्रफुल राठोड, शैलेश यादव, मुकेश वाघाडे, कविता गोंडाने, राजु भोयर, राजकुमार सातुर यांचे पथकाने पार पाडली आहे.