संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी कामठी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आज 5 जून रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी व डॉ सबा खान यांच्या मुख्य उपस्थितीत झाडे लावा, झाडे जगवा हा पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस हा पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीची आपल्याला जाणीव आणि दृष्टिकोन देतो.असे मत डॉ शबनम खाणुनी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विविध उपक्रम आयोजित करून , झाडे लावा उपक्रम राबवून पुढील धोका टाळण्याचे कार्य केल्या गेले . या सगळ्यातून पर्यावरणाचे महत्व बिंबवले गेले.
याप्रसंगी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्त कार्यालयीन कर्मचारी सह आशा वर्कर गण उपस्थित होते.