संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हमालपुरा येथे मोलमजुरी करून घरी परत येत असलेल्या 60 वर्षीय रेखा बोरकर नामक महिलेची दिवसाढवळ्या सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची घटना मागील महिन्यात 21 एप्रिल ला घडली असता यातील आरोपीचा शोध घेण्यात जुनी कामठी पोलिसांना अजूनही यशप्राप्त झाले नसून या घटनेला विराम मिळत नाही तोच या घटनास्थळाच्या कडेला असलेल्या हरदास नगर येथे सुनील चहांदे यांच्या कुटुंबात आयोजित लग्न समारंभात सहभागी व्हायला आलेल्या एका 74 वर्षोय वृद्ध महिलेची हरदास नगरच्या विहार समोर दीड तोळ्याची सोनसाखळी एका 25 वर्षीय अज्ञात तरुणाने हिसकावून पळ काढल्याची घटना काल 13 मे ला सायंकाळी साडे पाच घडली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी 74 वर्षीय महिला शोभा गणवीर रा. वरठी भंडारा ने जुनी कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली असून पुढील तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुमडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झालेल्या आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.