नागपूर :- दक्षिण नागपूर येथील मानेवाडा रिंग रोड येथील अमरनगर हनुमान मंदिर समाजभवन चिखली रोड, गजानन सभागृहासमोर निःशुल्क डोळे तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रिया शिबिर रविवारी 12 मे रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. निशुल्क वैद्यकीय तपासणी व औषधी वाटप होईल. तसेच शिबिरात महात्मे रुग्णालयाचे नेत्रतज्ञ आपली सेवा उपलब्ध करून देतील. निवड झालेल्या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया महात्मे नेत्रपेढी व रुग्णालय नागपूर येथे मोफत केल्या जाईल. येण्या-जाण्याची, भोजनाची, निवासाची व्यवस्था, निःशुल्क केल्या जाईल. रुग्णांनी येताना सुरू असलेली औषधी व कागदपत्रे सोबत आणावी व डॉक्टरांना दाखवावी. तसेच अल्प दरात चष्मा करून देण्यात येईल. त्याची किंमत फक्त 150 रुपये घेतले जाईल. आयोजन पद्मश्री डॉ. विकास महात्मे माजी खासदार, तसेच अमर नगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देविदास आगरकर, सचिव वसंतराव ईजनकर तसेच गणपतराव निंबाळकर, डॉ. राजेश कुराडे, विजय पवार आणि भोयर हे परिश्रम घेत आहे. वस्तीतील नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजन आयोजकांनी केले आहे.
देविदास आगरकर यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा – 9423636231