नागपूर :- कमला नेहरू महाविद्यालयाने 26 व 27 एप्रिल 2024 दरम्यान शारदा युनिव्हर्सिटी, नोएडा आणि CSIR-NEERI, यांच्या संयुक्त विद्यमाने ASFM-2024 या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे ‘अॅडव्हान्स सस्टेनेबल फ्युचरिस्टिक मटेरियल्स’ या विषयावर आयोजन अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी आणि संस्थेचे सचिव तथा आमदार अॅड. अभिजीत वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या परिषदेचे उद्घाटन CSIR-NEERI येथे करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून अमर सेवा मंडळाच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मीता बंजारी हया अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या, तसेच डॉ. मोहम्मद नाजर, प्रिसिंपल सायंटिस्ट, जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनीयम रिसर्च डेव्हलपमेंट अॅन्ड डिझाईन सेंटर, नागपूर हे प्रमुख अतिथी म्हणून आणि डॉ. नितीन लाभसेटवार, चिफ सायंटिस्ट अॅन्ड चेअर, एनकायरंमेंट रिर्सास प्लॅनिंग अॅन्ड मॅनेजमेंट व्हर्टिकल, CSIR-NEERI, नागपूर व डॉ. एन.बी. सिंग, शारदा युनिव्हर्सिटी, ग्रेटर नोएडा हे प्रामुख्याने उपस्थित होते. या परिषदेला प्रो. रामेश्वर अधिकारी, त्रिभुवन युनिव्हर्सिटी, काठमांडे, नेपाल यांनी प्रामुख्यने आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिलीप बढवाईक, प्राचार्य, कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर आणि परिषदेची संपूर्ण रूपरेषा डॉ. वासुदेव गुरनूले, समन्वयक, ASFM-2024 यांनी मांडली. या परिषदेला विभिन्न देशातील 500 पेक्षा जास्त प्राध्यापक, संशोधक तसेच नामांकित वैज्ञानिकांनी सहभाग घेतला असून त्यांनी आपले शोधकार्य या परिषदेत प्रस्तुत केले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत 290 पोस्टर आणि 115 ओरल प्रेझेंटेशन करण्यात आले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेला कमला नेहरू महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे सहकार्य लागले.