नागपूर :- एम.आय.डी.सी पोलीसांचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, ईसासनी स्मशान घाटा समोर, रोडवर एक ईसम हातात लोखंडी कोयता घेवून धूमधाम करीत असतांना दिसल्याने, पोलीसांना पाहून नमुद इसम हा पळाल्याने त्याचा पाठलाग करून त्यास थोड्या अंतरावर पकडले. त्याचे हातातील एक धारदार लोखंडी कोयता, किंमती अंदाजे ३००/- रू चा जप्त करण्यात आला. आरोपीस त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मुकूल सतिश रौवतेल वय २२ वर्ष रा. जिल्हा परिषद शाळेमागे, ईसासनी, नागपूर असे सांगीतले,
आरोपी हा कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने शस्त्रासह समक्ष मिळुन आल्याने तसेच, त्याने सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, पोलीस ठाणे एम.आय.डी.सी येथे आरोपीविरूध्द कलम ४/२५ भा.ह.का सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.