– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई
नागपूर :- पो. स्टे. मौदा हद्दीत स्टाफसह अवैध गोवंश वाहतूकीस आळा घालणेकरिता पेट्रोलिंग करीत असताना मौजा पावडदोना शिवारात लहान मालवाहू चारचाकी वाहन क्र. MH-३०-DD३८५५ मधून अवैध रित्या निर्दयतेने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने मौजा पावडदोना शिवारात नमूद वाहणाला पकडून पाहणी केली असता वाहन क्र. MH-३०-DD -३८५५ मध्ये ०९ गोवंशिय जनावरे अत्यंत निर्दयतेने कोंबून, आखूड दोरखंडा ने बांधुन व जनावरांची चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करतां कत्तली करिता घेऊन जातांना मिळून आल्याने वाहन बालक यास ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून ०९ गोवंशिय जनावरे प्रत्येकी १५०००/- प्रमाणे १,३५,०००/- रू व मालवाहू वाहन ५,००,०००/- रु. असा एकूण ६,३५,०००/- रू. चा माल जप्त करण्यात आला असून सदर वाहना मधील गोवंशिय जनावरांना योग्य व्यवस्थापनार्थ गोरक्षण केंद्र भंडारा येथे दाखल करून आरोपीता विरुद्ध कलम ११(१) (ड) प्रा. छळ प्रति. अधि. १९६० सहकलम ५ अ (१),९ महा. प्रा. सं. अधि. १९७६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही हर्ष पोद्दार, पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, कामठी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक निलेश डोर्लिकर, पोलीस हवालदार अनिल कोकोडे, पोलीस अंमलदार सचिन हटवार, प्रदीप खिल्लारे, अतुल निंबरते. शुभम ईश्वरकर यांनी केली.