नागपूर :- बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावती यांच्या दिशा निर्देशानुसार बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रातील प्रथम फेरीचे पाचही लोकसभा उमेदवार स्वबळावर लढवीत आहे.
उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने बसपाचे नागपूर व रामटेकचे दोन्ही उमेदवार सकाळी 11 वाजता संविधान चौकात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपले उमेदवारी अर्ज सादर करतील.
याप्रसंगी बसपाचे राष्ट्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रदेश चे मुख्य प्रभारी खा रामजी गौतम यांच्या निर्देशाने प्रदेश प्रभारी नितीन सिंग, प्रदेशाध्यक्ष ऍड परमेश्वर गोणारे, राज्याचे महासचिव व विदर्भ झोनचे इन्चार्ज ऍड सुनील डोंगरे, पृथ्वीराज शेंडे, दादाराव उईके प्रामुख्याने उपस्थित राहतील. फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.