उमरेड :- पोलीस स्टेशन उमरेड अंतर्गत दिनांक १९/०३/२०२४ रोजी सकाळी ०५.०० वा सुमारास गोपनिय माहीती मिळाल्यावरुन भिवापूर मार्गे व भिसी मार्गे उमरेड व उमरेड वरून नागपूर येथे काही टिप्परव्दारे अवैध रेती वाहतुक केली जात आहे. अशा माहीती वरून पोलीस स्टेशनचे उमरेडचे पथकाने पोस्टे हददीत वेगवेगळ्या तीन ठिकाणी नाकाबंदी लावुन अवैध वाहतुक करणारे एकूण ०६ टिप्पर थांबवुन चेक केले असता त्यामध्ये अवैधरित्या विना रॉयल्टी रेती वाहतुक करतांना मिळुन आले. १) टिप्पर क्र. MH 40 BL 3374 किंमती २०,००,०००/- रू. व त्यामध्ये ०५ ब्रास विना रॉयल्टी भरलेली रेती किं. २५,०००/- रु. २) टिप्पर क्र. MH 36 F 3683 किंमती १५,००,०००/-रू, व त्यामध्ये ०५ ब्रास विना रॉयल्टी भरलेली रेती किं. २५,०००/-रू. ३) टिप्पर क्र. MH 40 BG 5972 किं. १८,००,०००/-रु. व त्यामध्ये ५ ग्रास विना रॉयल्टी भरलेली रेती किं. २५,०००/-रु. ४) टिप्पर क्र. MH 40 AK 4170 किंमती १८,००,०००/- रू. व त्यामध्ये ५ ब्रास विना रॉयल्टी भरलेली रेती किं. २५,०००/-रू. ५) टिप्पर क्र. MH 40 BL 4673 किं. २५,००,०००/- रू. व त्यामध्ये ५ ब्रास विना रॉयल्टी भरलेली रेती किं. २५,०००/-杯。 ६) टिप्पर क्र. MH 49 AT 3959 किंमती २०,००,०००/- रू. व त्यामध्ये ०५ ब्रास विना रॉयल्टी भरलेली रेती किं. २५,०००/- रू. असा एकूण १,१७,५०,०००/-रु. चा मुददेमाल जप्त केला आहे. टिप्पर चालक व मालक आरोपी नामे १) कमलेश सहादेव मेश्राम वय ३२ वर्ष रा. कारथा जि. भंडारा, २) देविदास ढगे रा. माळगी नगर नागपूर, ३) आदित्य कोचीराम वांढरे वय २१ वर्ष रा. कुही जि. नागपूर, ४) मंगेश रवि पवारे वय २१ वर्ष रा. निलज जि. भंडारा,५) दिनेश रामुजी भरडे वय २९ वर्ष रा. बेसुर जि. नागपूर, ६) अनुप शामराव मंडपे, ७) विनोद कवडुजी तुळणकर, ८) कोमल कैलास वंजारी वय ३१ वर्ष रा. सुरगाव जि. नागपूर, ९) दिपक विष्णु मसराम वय २२ वर्ष रा. पाचगाव जि. नागपूर, १०) विनोद वाघमारे, ११) प्रविण ठाकरे यांचे कृत्य कलम ३७९, १०९ भादवी सह कलम ४८ (७), ४८(८) महा जमीन महसुल अधिनियम १९६६, सहकलम ४, २१ खाण आणि खनिज अधिनियम १९५७ सहकलम ०३ सार्वजनीक मालमत्ताचे नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ अन्वये होत असल्याने आरोपीतां विरुध्द गुन्हे नोंद केले आहे.
सदरची कारवाई हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, रमेश धुमाळ, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण, राजा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरेड विभाग उमरेड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, ठाणेदार पोस्टे उमरेड, पोहवा प्रदिप चवरे, पोहवा राधेशाम कांबळे, पोना पंकज बटटे, पोशि रोशन सहारे, आशिष खरावे, अमोल तायडे यांनी केली आहे.