संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– पल्स पोलिओ रैली काढुन जनजागृती केली.
कन्हान :- श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा येथे पल्स पोलिओ रॅली काढुन जनजागृती करून दफ्तर मुक्त शनिवार साजरा करण्यात आला.
श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे दर शनिवारला दफ्तर मुक्त शनिवार राबवण्यात येतो. या दिवशी विद्यार्थ्यांना विविध खेळ, पीटी, शैक्षणिक ॲक्टिव्हिटी द्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासासाठी आरोग्य विषयी ची माहिती दिली जाते.
या शनिवार (दि.२) मार्च ला शाळेतील विद्यार्थ्याची रैली काढुन कन्हान च्या मुख्य मार्गाने विद्यार्थ्यानी फलक हातात घेऊन घोषणा देऊन जातात. पल्स पोलिओ विषयी जनजागृती कर ण्यात आली. यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यानी उत्साहाने सहभाग घेतला होता.